पोस्ट्स

Abhinav Dhamnaskar लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कथा संघर्षाची : दांडेकरपूल वस्तीतला आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू अभिनव धामणसकर

इमेज
दांडेकरपूल वस्तीतल्या आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू  अभिनव धामणसकर गोष्ट राहुल शेळके तुमच्यात तुमची स्वप्नं पूर्ण करण्याची जिद्द असेल तर कोणतंही ध्येय गाठणं अशक्य नसतं, याचं उत्तम उदाहरण म्हणजे फुटबॉलपटू अभिनव धामणसकर. कष्टकरी कुटुंबात जन्मलेली मुलं फुटबॉलसारख्या खेळामध्ये राहून नाव कमावणं ही गोष्ट अवघड आहे. त्याचं कारण आर्थिक परिस्थिती, त्यात पालकांची खेळांच्या बाबतीत असलेली उदासीनता. त्यामुळे अनेक मुलं-मुली खेळामध्ये करियर करण्याचा विचार करत नाहीत. पण या सर्व मर्यादा अभिनवने ओलांडल्या आणि अवघ्या सतराव्या वर्षी भारतीय फुटबॉल संघाचं प्रतिनिधित्व केलं.   21 वर्षीय अभिनव दांडेकरपूल वस्तीतल्या कोकणे आळीत राहणारा तरुण. त्याचे वडील इलेक्ट्रिशियनची कामं करतात, तर त्याची आई धुण्या-भांड्यांची कामं करते. घरात तो, त्याचा लहान भाऊ, आई-वडील आणि आजी असं पाचजणांचं छोटं कुटुंब. अभिनवला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. त्याला फुटबॉल हा खेळ जास्त आवडायचा. टिळक रस्त्यावरच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेला फुटबॉलचा मोठा इतिहास आहे. शाळेतले अनेक विद्यार्थी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर खेळलेले आहे...