कथा संघर्षाची : ‘अन्नपूर्णा'च्या मदतीने मी सावरले
‘अन्नपूर्णा परिवारा'च्या मदतीने एक महिला छोटी-मोठी कर्जं घेऊन आपल्या कुटुंबाला सावरते त्याची गोष्ट. टीम सलाम पुण्याच्या उत्तमनगरमध्ये राहणाऱ्या भारती सूर्यवंशी यांची ही गोष्ट. भारती यांचे पती अशोक रिक्षा चालवायचे. नवरा-बायको आणि सहा महिन्यांची मुलगी असं कुटुंब होतं. पतीच्या उत्पन्नावरच सूर्यवंशी यांचं कुटुंब चालत होतं. पण काही वर्षांपूर्वी त्यांच्या कुटुंबावर मोठं संकट ओढवलं. अशोक यांचं दुर्धर आजाराने निधन झालं. तेव्हा भारतीताईंची मुलगी अवघी ... होती. अशा दुःखद प्रसंगातून सावरणं सोपं नव्हतं. पण भारतीताईंनी मुलीसाठी दुःख बाजूला सारलं. घर चालवण्यासाठी भारतीताई छोटी-मोठी कामं करू लागल्या; पण कामावर असताना बाळाला सांभाळणं कठीण जायचं. तेव्हा ओळखीच्या लोकांनी त्यांना घराबाहेरच सुक्या बोंबिलाचा स्टॉल लावण्याचा सल्ला दिला. हा व्यवसाय करताना बाळाचा सांभाळ करणं शक्य होतं. म्हणून भारतीताईंनी बोंबिलाचा व्यवसाय करण्याचं नक्की केलं; पण त्यासाठी भांडवलाची गरज होती. लग्नानंतर भारतीताईंचा दोन्हीकडच्या परिवाराशी फारसा संबंध नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडे पैसे मागणं शक्य नव्हतं. पैशांची व्यवस्थ...