पोस्ट्स

Dadarao shinde लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वस्तीतले धडपडे : राजेंद्र नगरचे सुपर स्ट्रायकर दादाराव शिंदे

इमेज
कामाच्या रगाड्यातही आपला छंद जोपासता येतो आणि एवढंच काय, त्याच्या बळावर आपली ओळखही बनवता येते, याचं जिवंत उदाहरण म्हणजे दादाराव शिंदे.  नितीन गांगर्डे दादाराव शिंदे हे एक हौशी कॅरमपटू आहेत. आपलं पोटापाण्याचं काम सांभाळत त्यांनी कॅरम खेळण्याची आपली आवड जोपासली आहे. एकाग्रता, स्ट्रायकरवरची पकड आणि एकदा स्ट्रायकर हातात आला की खेळ संपवून टाकायचा, ही दादारावांची खासियत आहे. खेळात मिळवलेल्या प्राविण्यामुळे दादाराव अनेक स्पर्धांमध्ये खेळत असतात आणि बक्षिसंही मिळवत असतात. पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्येही त्यांनी या खेळाच्या जोरावर आपली ओळख तयार केली आहे.  42 वर्षांचे दादाराव पुणे महानगरपालिकेच्या वानवडी घनकचरा व्यवस्थापन विभागात सफाई कर्मचारी आहेत. ते राजेंद्र नगरच्या एसआरएमध्ये राहतात. पण सससदादारावांचं लहानपण लोहियानगर-काशेवाडी या परिसरामध्ये गेलं. त्या परिसरामध्ये कॅरमप्रेमी लोक बरेच असल्याने त्यांना कॅरमची गोडी निर्माण झाली. त्यांची आवड बघून त्यांच्या आईने लहानपणीच कॅरम आणून दिला. आधी घरी आणि मग वस्तीतील कॅरम क्लबमध्ये ते खेळू लागले. स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. स्पर्धा जि...