पोस्ट्स

Manda Dahire लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वस्तीतले धडपडे : जिथे कामाची संधी तिथे मंदाताई

इमेज
आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या कुटुंबला आणि वस्तीलाही झाला पाहिजे, या विचाराने सतत धडपडणाऱ्या मंदाताईंची गोष्ट  श्रुती कुलकर्णी वारज्यातल्या रामनगरमध्ये राहणाऱ्या मंदाकिनी दहिरे आज वस्तीत ‘मॅडम' म्हणून ओळखल्या जातात. एवढा आदर त्यांना मिळतो तो त्यांच्या शिक्षणाबाबतच्या आस्थेमुळे. मंदा दहिरे मूळच्या  बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातल्या. तिथे त्यांनी बीएपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांचे वडील शिवणकाम करायचे. अंगणवाडी सेविका असलेल्या आईचं मंदाताईंच्या लहानपणीच निधन झालं होतं. घरची परिस्थिती यथातथाच. शिवाय घरकामाची जबाबदारी. पण सगळं सांभाळत त्यांनी शिक्षण सुरू ठेवलं. बीए झाल्यानंतर पुढे आणखी शिकावं, नोकरी करावी असं त्यांना वाटायचं. पण घरच्यांनी लगेचच लग्न लावून दिलं. मग त्या नवऱ्यासोबत रोजगारासाठी पुण्यात आल्या. तिथून पुढे खरा संघर्ष सुरू झाला. ‘या संघर्षाबद्दल बोलायलाच नको. ते आठवलं तरी अंगावर काटा येतो,' असं मंदाताई म्हणतात.  1995मध्ये पुण्यातल्या रामनगर वस्तीत राहायला आल्यावर पत्र्याची एक छोटीशी शेड हेच मंदाताईंंचं घर बनलं. त्यांचे पती पेंटिंगचं काम करायचे. त्यावरच सुरुवाती...