पोस्ट्स

Tejas Indapurkar लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कथा संघर्षाची : तेजस इंदापूरकर; सिनेस्वप्नाचा पाठलाग

इमेज
आपण या वस्तीमध्ये जन्मलो आणि इथेच आपली माती होणार, असं वाटत असेल तर थोडं थांबा. तेजस इंदापूरकर या तरुणाच्या स्वप्नांची झेप पहा... अप्सरा आगा पुण्याच्या दांडेकर पुलाजवळील वस्तीत जन्मलेला नि वाढलेला तेजस इंदापूरकर. हा मुलगा सध्या मुंबईत टिव्ही वाहिन्यांवरील मालिकांचा असिस्टंट डायरेक्टर आहे. पण त्याचं स्वप्नं केवळ कॅमेऱ्यामागे राहण्याचं नाही. त्याला पडद्यावर यायचंय. आपलं स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी तो जीवतोड मेहनत घेतोय. तेजस छोटा होता तेव्हापासून घरात गरिबी होती. तेजसची आई घरोघरी जाऊन जुने कपडे गोळा करायची. ते शिवून विकायची. वडील घरातच लोकांचे कपडे इस्त्री करून देत. या दोघांच्या मेहनतीतून कसंबसं निभत होतं. त्यातच तेजसच्या वडिलांना दारूचं व्यसन लागलं. पाठोपाठ कसल्याशा आजाराने त्यांचे डोळेही अधू झाले. काम जवळपास थांबलंच. त्यामुळे तेजसच्या आईवर घराची सगळी जबाबदारी आली. त्यामुळे त्यांनी डबल काम सुरू केलं. दिवसा एका ऑफिसमध्ये मोलकरणीचं काम करायचं आणि कामावरून आल्यावर कपड्यांना इस्त्री करायची. अशा कठीण परिस्थितीत तेजस मोठा होत होता. शिकत होता. तो साने गुरुजी संस्थेच्या रावसाहेब पटवर्धन शाळ...