वस्तीतले धडपडे : अक्षयची 'नीट' भरारी

ज्या परीक्षेसाठी मुलं हजारो रुपयांचे क्लास लावता, पण अक्षय ही परीक्षा क्लास न लावता पास झालाय. त्याची गोष्ट.. नितीन गांगर्डे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी 'नीट'ची प्रवेशपरीक्षा पास होणं आवश्यक असतं. या परीक्षेची तयारी विद्यार्थी नववी-दहावीपासूनच सुरू करतात. त्यासाठी महागडे क्लास, अभ्यासिका लावतात. पण बिबवेवाडमधील भिम दिप वसाहतीत राहणाऱ्या अक्षय बोरेने कोणत्याही क्लासशिवाय आणि अभ्यासिकेशिवाय ही परीक्षा दिली. तो नुसता पास नाही झाला तर त्याने चांगले गुण मिळवले. आज अक्षयने डॉक्टर होण्याच्या दिशेने महत्त्वाचं पाऊल टाकलंय. अक्षय, त्याचे आईवडील अशा तिघांचं छोटं कुटुंब. वडील मूळचे सोलापूरमधल्या करमाळा तालुक्यातले. रोजगारासाठी पुण्यात आलेले. शौचालय साफ करणाऱ्या कुटुंबाला शौचालयावरची खोली राहण्यासाठी मिळते, ती खोली अक्षयच्या वडिलांना मिळाली. साफसफाई आणि बिगारी काम करून ते आपलं घर चालवत. पण या कामातून दोनवेळचं अन्न मिळेल याची बोरे कुटुंबियांना खात्री नसायची. आपण भोगलं ते मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून अक्षयच्या आईवडिलांनी त्याला चांगलं शिक्षण द्यायचं ठरवलं. अक्षयचा स्...