पोस्ट्स

annapuran story लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कथा संघर्षाची : पावसाळ्यात पडणारं घर उभं केलं ‘अन्नपूर्णा'ने

इमेज
‘अन्नपूर्णा'च्या साथीने उभं राहिलं वंदनाताईंचं घर  टीम सलाम  दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या वंदना सचिन जगताप या अन्नपूर्णा परिवाराच्या अनेक वर्षांपासूनच्या सदस्य. दोन मुलं, सासू-सासरे, पती आणि त्या असं हे कुटुंब पत्र्याच्या घरात राहायचं. 38 वर्षांच्या वंदनाताईंचे पती बांधकाम साइटवर सुपरवायजर म्हणून काम करतात. गृहकर्जासाठी त्या दोन वर्षं वेगवेगळ्या बँकांचे उंबरे झिजवत होत्या, पण त्यासाठी लागणारी कागदपत्रं आणि सरकारी नोकरीमध्ये असणारे दोन जामीनदार मिळणं अवघड जात होतं. शिवाय व्याजदरही खूप जास्त होता. पण ‘अन्नपूर्णा' संस्थेच्या सभासद असल्यामुळे वंदनाताईंना घराच्या डागडुजीसाठी सहजपणे कर्ज मिळालं.  “पूर्वी आमचं पत्र्याचं घर होतं. पावसाळ्यात घराजवळच्या नाल्याला पूर आला की घराच्या दोन भिंती दरवर्षी कोसळायच्या. पावसाळ्यात घरी राहणंही कठीण व्हायचं. माणसाने जायचं तरी कुठे?  पडलेल्या भिंती दरवर्षी पुन्हा बांधाव्या लागायच्या. ‘अन्नपूर्णा'ने गृहकर्ज दिल्यामुळे पक्कं घर बांधलं आणि आमची अडचण कायमची दूर झाली,” असं वंदनाताई सांगतात.  वस्तीपातळीवर राहणाऱ्या आणि कमी उत्पन्न गटातील महि...