पोस्ट्स

bnolenath kulfi लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कथा संघर्षाची : 50 वर्षं जुनी जय भोलेनाथ कुल्फी

इमेज
दत्तवाडी ते मंडई अशा मोठ्या पट्ट्यात बबनरावांची कुल्फी इतकी प्रसिद्ध, की ‘कुल्फी घ्या कुल्फी' असं त्यांना ओरडण्याची गरजच राहिलेली नाही.  टीम सलाम काजू-बदाम असलेली चविष्ट कुल्फी विकण्यासाठी आपली गाडी घेऊन घंटी वाजवत फिरणारा; पांढरा शर्ट, पायजमा आणि पांढरी टोपी घातलेला एक म्हातारा माणूस सदाशिव पेठ, नवी पेठ, दांडेकर पूल, दत्तवाडी वगैरे परिसरात राहणाऱ्यांच्या चांगल्या ओळखीचा आहे. त्यांचं नाव आहे बबन शिळीमकर; पण जय भोलेनाथ कुल्फीवाले ही त्यांची लोकांमधली ओळख. गेल्या 50हून अधिक वर्षांपासून ते कुल्फीचा व्यवसाय करत आहेत. त्यांनी घंटी वाजवली की लहान-थोर सगळेच त्यांच्या कुल्फीकडे ओढले जातात.  वयाच्या अवघ्या सोळा-सतराव्या वर्षी बबनरावांनी ट्रकवर क्लीनर म्हणून काम सुरू केलं. त्या वेळी त्यांच्या आई-वडिलांच्या कानावर अपघाताच्या बातम्या यायच्या. म्हणून त्यांनी बबनरावांना ते काम सोडायला लावलं. पण कमावणं तर भागच होतं. मग बबनरावांनी भाजीपाला विकला, सरबत आणि बर्फाच्या गोळ्यांची गाडी लावली; पण त्यांचं बस्तान बसत नव्हतं. एकदा बबनरावांच्या कुल्फी विकणाऱ्या एका मित्राने त्यांना कुल्फीच्या व्यवसायाची...