पोस्ट्स

kalpna adhav लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कथा संघर्षाची : कर्तृत्ववान कल्पनाताई

इमेज
कल्पनाताईंनी मुलाच्या शिक्षणासाठी आयुष्य वेचलंय. या मायलेकराचा प्रेरणादायी संघर्ष... तुषार कलबुर्गी ‘हार मानू नये, जिद्द ठेवावी. स्वप्नं पहावीत.' कळतनकळत कल्पना आढावांचं हे जीवनसूत्र बनलंय. त्यांनी हलाखीच्या परिस्थितीत मुलाला उच्चशिक्षित बनवण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. त्यासाठी खस्ता खाल्ल्‌‍या, वेगवेगळी कामं करत, स्वत:ला बदललं. निराधार स्त्री मनात आणलं तर स्वतःचं नशीब पालटू शकते. याचं उदाहरण म्हणजे कल्पनाताई. कल्पनाताई पिंपरीतल्या गुरुदत्त नगरमध्ये एका छोटयाश्या घरात राहतात. त्यांनी धुण्याभांड्यापासून सिक्युरिटीगार्डपर्यंत, मिळेल ते काम केलं. आपला मुलगा, अमितला शिक्षण दिलं. अमितनेही एक एक इयत्ता पूर्ण करत फिजिओथेरेपीचं शिक्षण पूर्ण केलं. अमितला आता परदेशात उच्चशिक्षणासाठी जायचंय. त्यासाठीचा खर्च लाखांच्या घरात आहे. पण काहीतरी मार्ग निघेलच, अशी आशा कल्पनाताईंना वाटते. कल्पनाताई मुळच्या नगर जिल्ह्यातल्या. लग्नानंतर पुण्यात आल्या. एका छोट्याशा घरात संसार थाटला. पण अमितच्या जन्मानंतर काहीच महिन्यात पतीने कल्पनाताईंची साथ सोडली. तान्ह्या बाळाला घेऊन जगायचं कसं, हा प्रश्न त्यांना सतावत ह...