पोस्ट्स

mangal gaikwad लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वस्तीतले धडपडे : मला सी ए व्हायचंय, मी सी ए होणारच!

इमेज
दहा बाय दहाच्या पत्र्याच्या घरात राहून एक हुशार मुलगी सीए व्हायचं स्वप्न बघतेय. परिस्थिती विपरित असूनही तिचं कुटुंबही तिच्या पाठीशी आहे. तिच्या संघर्षाची गोष्ट. तुषार कलबुर्गी मंगल गायकवाड लोहियानगरमधल्या इनामके मळ्यात राहणारी मुलगी. ती सीए बनण्याचं स्वप्न पाहतेय. सीएच्या सुरवातीच्या दोन परीक्षा ती पास झालीये. नोव्हेंबर 2021 मध्ये तिची सीएची अंतिम परीक्षा आहे. आयुष्याचा एक मोठा टप्पा पार करण्याच्या तयारीत ती आहे. मंगल लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. पहिली ते आठवीपर्यंत शाळेत प्रथम क्रमांक पटकावत गेली. नववीत मात्र तिला प्रथम क्रमांक पटकावत आला नाही. कारण नववीच्या पेपरच्या दिवशीच तिच्या बाबांचं निधन झालं. मृतदेह दारात होता आणि तिला परीक्षेला जायचं होतं. पण ती धीराने शाळेत गेली आणि तिने पेपर सोडवले. दहावीला मात्र तिने जोरदार तयारी करत 87 टक्के गुण मिळवले. या सर्वांच्या जोरावर तिला विज्ञान शाखेत प्रवेश मिळू शकला असता. पण विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पुढे डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ शकेल, इतके पैसे तिच्याकडे नव्हते. म्हणून तिने कॉमर्सला प्रवेश घेतला. तिच्या शाळेच्या साळुंके मॅडमना मंगलच्या हु...