वस्तीतले धडपडे : शिकण्यासाठी धडपडणाऱ्या मीनाताई

आर्थिक परिस्थिती बेताची असताना संसार सांभाळत शिक्षण घेण्यासाठी धडपडणाऱ्या महिलेविषयी.. सतिश उगले आपल्याकडे आजही अनेक मुलींचं शिक्षण सुरू असतानाच त्यांची लग्नं लावली जातात. त्यामुळे बऱ्याच मुलींना इच्छा नसूनही चूल आणि मूल या चक्रात अडकावं लागतं. पण त्यातूनही मार्ग काढत अनेक बायका आपलं राहिलेलं शिक्षण पूर्ण करतात, आपल्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी धडपडतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे 40 वर्षांच्या मीना वाघमारे. मीनाताईंनी लग्नानंतर शाळेत अर्धवट सोडलेलं शिक्षण पूर्ण करून पदवीपर्यंत मजल मारली. त्या आता एका संस्थेत शिक्षिका म्हणून काम करत आहेत. मीनाताईंचा जन्म लातूरचा. शाळेत त्या हुशार होत्या. सहावीपर्यंत त्या गावात शिकल्या. पण पुढच्या शिक्षणासाठी त्यांना दुसऱ्या गावाला जावं लागणार होतं. गावची फार कमी मुलं दुसऱ्या गावातल्या शाळेत जायची. मीनाताई त्यातल्याच एक. मीनाताईंच्या वडिलांची आर्थिक परिस्थिती जेमतेमच. म्हणून त्यांनी अवघ्या तेराव्या वर्षीच मीनाताईंचं लग्न ठरवलं. आत्याच्या मुलासोबत मीनाताईंचा साखरपुडा झाला आणि दहावी पूर्ण झाल्या झाल्या घरच्यांनी लग्न लावून दिलं. मीनाता...