पोस्ट्स

pandurang autade लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वस्तीतले धडपडे : ‘चटकदार मसाले'वाले रामनगरचे आजोबा-आजी

इमेज
दुचाकीवर फिरून वस्त्या-वस्त्यांमध्ये चटकदार मसाले पोहोचवणारे रामनगरमधील जिगरबाज अवताडे आजोबा आणि त्यांच्या पत्नीची ही प्रेरणादायी गोष्ट टीम सलाम पांडुरंग अवताडे. वारज्यातील रामनगर वस्तीत राहणारे सत्तर वर्षांचे जिगरबाज आजोबा. पुण्यातल्या बऱ्याचशा वस्त्यांमध्ये त्यांची मसालाविक्रीची दुचाकी गाडी पाहायला मिळते. त्यांच्या गाडीवर लावलेल्या मसाल्याच्या पाटीकडे खवय्याचं लक्ष जातंच जातं. कांदा, लसूण, कारळे, जवस, शेंगदाणा या चटण्या, हळद, काळा मसाला आणि गावरान आंब्याचं लोणचं घरीच बनवून ते विकण्याचं काम पत्नी संगीताताई यांच्या साथीने मागील 25 वर्षांपासून न थकता करतायत.  पंधरा वर्षं हमाली; नंतर टाकले उद्योगाकडे पाऊल 1972 साली पडलेल्या दुष्काळानंतर सोलापूरच्या करमाळा भागातून अवताडे कुटुंबाने पुण्याची वाट धरली. इथे आल्यानंतर सुरुवातीची 7-8 वर्षं दोघा नवरा-बायकोने मिळून बिगारीकाम केलं. त्यानंतर पांडुरंगभाऊ पुणे स्टेशनवरील मालधक्क्यावर हमालीकाम करू लागले. 15 वर्षं ओझी उचलण्याची कामं केल्यानंतर माथाडी बोर्डातून चाळीस हजार रुपयांचं कर्ज घेऊन त्यांनी मिरची कांडप यंत्र खरेदी केलं. मिरच्या कुटून मसाला ब...