पोस्ट्स

sanjay londhe लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कथा संघर्षाची : ‘शांताबाई' फेम संजय लोंढे, अजूनही संघर्ष चालूच आहे!

इमेज
‘शांताबाई' या सुपरहिट गाण्याचे गायक संजय लोंढे यांचा जन्म गरीब कुटुंबात झाला. परिस्थिती बिकट असतानाही त्यांनी गाण्याची आवड जोपासली. कुटुंबात संगीताचा वारसा नसूनही आपल्या अंगच्या गुणांनी त्यांनी गायक, गीतकार आणि संगीतकार म्हणून नाव कमावलं. त्याची ही गोष्ट. नितीन गांगर्डे संजय लोंढेंचं ‘शांताबाई' हे गाणं ऐकलेलं नाही असा माणूस मिळणं अवघड. लग्नाची वरात असो किंवा गणेश विसर्जनाची मिरवणूक, त्यामध्ये हे गाणं हमखास वाजणार. त्यांनी गायलेली ‘देव धनगर वाड्यात घुसला', ‘सुटला माझा पदर बाई', ‘गिरणीवाले दादा' ही गाणीही लोक आवडीने गुणगुणत असतात. आज पन्नाशी गाठलेले संजयभाऊ पुण्याच्या ए. डी. कॅम्प चौक परिसरात राहतात. त्यांचे वडील नगरमधल्या कर्जत तालुक्यातले. पोटापाण्यासाठी रोजगाराच्या शोधात ते पुण्यात आले. त्यांना टिम्बर मार्केटमध्ये लाकडं विकण्याचं काम मिळालं. त्यांनी जवळच्याच राजेवाडीत छोटीशी खोली भाड्याने मिळवली. तिथेच संजयभाऊंचा जन्म झाला. तेव्हा त्यांची परिस्थिती हलाखीची होती. लाकडं विकण्याच्या कामातून कुटुंबाचं पोट भरेल एवढेच पैसे वडिलांना मिळायचे. संजयभाऊ शाळेत जाऊ लागल्यावर त्...