पोस्ट्स

shubhangi chavan लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कथा संघर्षाची : धडपडी, खटपटी, स्वावलंबी आई शुभांगी चव्हाण

नवऱ्याचा जाच सहन करत, अल्प शिक्षणाचा अडथळा पार करत आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी धडपडणाऱ्या महिलेची गोष्ट.. सतीश उगले “पोरांना नुसतं शाळेत सोडायला जा म्हटलं की माझा नवरा माझ्याकडून गाडीत पेट्रोल टाकायला पैसेे मागायचा. मुलांच्या शाळेचा विचार करून मी नाईलाजाने द्यायचे. मला या गोष्टीचा वैताग आला. एक दिवस मी ठरवलं आणि टू-व्हिलर चालवायला शिकले. आणि पोरांना स्वतः शाळेत सोडायला लागले.” तीस वर्षीय शुभांगी चव्हाण आपल्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट सांगत होत्या. त्या पुढे सांगतात, “टू-व्हिलर शिकले तेव्हापासून कुठल्याच गोष्टीसाठी नवऱ्यावर अवलंबून राहायचं नाही असं ठरवलं.” त्यांनी केलेला निर्धार आतापर्यंत खरा ठरलेला आहे. त्या सध्या दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दलात लेडी बाऊन्सरचं काम करतायत. आणि याच्या जोरावर आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देण्यासाठी धडपडत आहेत. शुभांगीताईंचं बालपण उस्मानाबाद जिल्ह्यातील कटी या छोट्याशा गावात गेलं. शालेय जीवनापासून त्यांना अभ्यासात गोडी होती. मैदानी खेळही त्यांना आवडायचे. खोखो-कबड्डीच्या स्पर्धांमध्ये त्या सहभागी होत. उच्च शिक्षण घेऊन मोठं व्हायचं स्वप्न होतं. पण दहावी...