कथा संघर्षाची : पन्नाशीला येऊन ठेपलेलं प्रसिद्ध ‘सोनल पॅटिस'
पुण्यातल्या पूर्वेकडच्या पेठांमध्ये राहणाऱ्या खवय्यांना पॅटिस खाण्याची इच्छा झाल्यावर त्यांच्या डोळ्यांसमोर पहिलं नाव ‘सोनल पॅटिस'चं येत असावं. तुषार कलबुर्गी कस्तुरे चौकातून महात्मा फुले पेठेकडे जाताना डाव्या बाजूला, चौकापासून हाकेच्या अंतरावर फक्त पॅटिसखाण्यासाठी झालेली तुंबळ गर्दी तुम्हाला पाहायला मिळेल. पावपॅटिस खाण्यासाठी इतकी गर्दी खेचणारं सोनल पॅटिस हे एकमेव ठिकाण असावं. सायकलवरच्या कष्टकऱ्यांपासून ते चारचाकीतल्या श्रीमंतांपर्यंत सर्व प्रकारचे लोक इथे आवर्जून जिभेचे चोचले पुरवायला येतात. इथे दिवसभरात हजारांहून अधिक पॅटिस खपतात. या दुकानात आलेला एक ग्राहक म्हणतो, “मी या भागात आलो तर एक तरी पॅटिस खाऊनच जातो. यांच्या पॅटीसचे दर 15 पैसे होते तेव्हापासून मी यांचं पॅटिस खातोय.” विशेष म्हणजे सोनल पॅटीसचं यशस्वी पन्नासावं वर्ष सुरू आहे. कसबा पेठ ते फुले पेठ या पट्ट्यामध्ये जेवढा परिसर येतो त्यामध्ये सोनल स्नॅक्स अगदी फेमस आहे. 65 वर्षीय सुरेश अनंत सूर्यवंशी आणि त्यांचे मोठे बंधू 69 वर्षीय रमेश सूर्यवंशी यांनी 1974 साली पॅटिसचा व्यवसाय सुरू केला. त्यांचं बालपण कस्तुरे चौकाजवळच...