पोस्ट्स

usha kamble लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कथा संघर्षाची : सावित्रीबाईंचा जागर मांडणारी उषा कांबळे

इमेज
घरातून शिक्षणाची अजिबात पार्श्वभूमी नसताना जिद्दीने शिकणाऱ्या आणि सावित्रीबाई फुले यांचा विचार देशापरदेशांत पोचवणाऱ्या उषाची कहाणी. अर्जुन नलवडे नगरच्या जामखेडमधील झिक्री हे उषाचं गाव. उषाने ‘होय, मी सावित्री बोलतेय...' या एकपात्री प्रयोगातून झिक्रीपासून थायलंडपर्यंतचा प्रवास केलाय; पण तिचा हा प्रवास सोपा नव्हता. ती भावनिक होऊन त्याविषयी सांगते, “घरात गरिबी पाचवीलाच पुजलेली. त्यात आम्ही चार भावंडं. तीन बहिणी आणि एक भाऊ. मीच त्यांच्यात थोरली. मी चौथीत असताना आमच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. त्यानंतर चार वर्षांनी आईनेही दुसरं लग्न केलं. दोघांनीही आपापला वेगळा संसार मांडला. त्यामुळे आमची जबाबदारी आजीवर आली. मानसिक तणावातून पुढे भावाने आत्महत्या करून जीवन संपवलं. आजीने शेतात काम करून, उसनंपासनं आणून आम्हा तिघींना सांभाळलं.” घरी अशी परिस्थिती असतानाही उषाने जिद्द सोडली नाही. शिकण्यात रस असल्यामुळे गावात बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यावर ती तालुक्याच्या गावी गेली. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे सेल्समनचं काम करत तिने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. त्यात चांगले मार्क्स मिळाले; पण पुढे काय हा प्र...