पोस्ट्स

vijay gurav लेबलसह पोस्ट दाखवत आहे

वस्तीतले धडपडे : वस्तीतून बॉक्सर घडवणारे प्रशिक्षक विजय गुजर

इमेज
एका सामान्य कुटुंबातल्या बॉक्सरने अनेक होतकरू मुलांना बॉक्सिंगचे धडे दिले. त्यातले अनेक खेळाडू राष्ट्रीय स्पर्धांमध्येही चमकले आहेत.  नितीन गांगर्डे काशिवाडी-भवानी पेठ भागामध्ये विजय गुजर यांचा बॉक्सिंग प्रशिक्षक म्हणून नावलौकिक आहे. गेली 22 वर्षं विजय सर माफक दरात आणि ज्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे अशा खेळाडूंना मोफत बॉक्सिंग शिकवतात. त्यांनी आतापर्यंत शेकडो बॉक्सर घडवले आहेत. ते म्हणतात, “बॉक्सिंग ही एक कला आहे, आणि मी एक कला शिकवतो.” विजय गुजर यांचा जन्म काशिवाडीतला. शिक्षण सरकारी शाळेमध्ये झालं. पाचवीत असताना त्यांना बॉक्सिंगची आवड लागली. त्या काळात त्यांनी अनेक स्पर्धांत सहभाग घेऊन बक्षिसं पटकावली. एवढंच नव्हे तर राष्ट्रीय स्पर्धेतही त्यांनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकं मिळवली. याशिवाय प्रतिष्ठेची समजल्या जाणाऱ्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेतही सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली.  राष्ट्रीय खेळाडूंना सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण असतं. त्यामुळे विजय सरांनी खेळाडू कोट्यातून रेल्वे भरतीसाठी अर्ज केला. ते सांगतात, “रेल्वेमधल्या अधिकाऱ्यांनी नोकरीसाठी लाच मागितली. म्हणून...