पोस्ट्स

Cricketer लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कथा संघर्षाची : जिद्दी क्रिकेटर ओंकार रौंदाळे

इमेज
ओंकारने अपघातात एक पाय गमवलेला असतानाही आत्मविश्वास आणि सरावाच्या जोरावर दिव्यांग क्रिकेटविश्वात त्याने स्वतःला सिद्ध केलं आहे. त्याच्या या प्रवासाबद्दल जाणून घेऊ या... अर्जुन नलवडे तीन वर्षांपूर्वी झालेल्या कार अपघातात ओंकारने आपला एक पाय गमावला. त्यातून त्याने स्वतःला सावरलं आणि लहानपणीचा आपला क्रिकेटचा छंद जोपासायला सुरुवात केली. तो जिद्दीने प्रॅक्टिस करत राहिला. त्याला मुंबई टीममध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्या संधीचं सोनं करत त्याने स्वतःला सिद्ध केलं. आज ओंकार महाराष्ट्र क्रिकेट व्हीलचेअर संघाचं नेतृत्व करतो. त्याची टीम विविध राज्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना दिसते. ओंकार रौंदाळे सामान्य घरातील मुलगा. तोही काही वर्षांपूर्वी इतरांसारखं चालायचा, धावायचा, खेळायचा. बारावीनंतर त्याने ‘बीएससी इन एमएलटी'(वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान)मध्ये प्रवेश घेतला अन्‌ दोन हजार पगाराची नोकरी करत शिक्षण घेऊ लागला; पण कोरोना महामारी आली आणि सगळंच बंद पडलं. तो वडिलांच्या कामात त्यांना मदत करू लागला. वडिलांसोबत रुग्णांचं कोविड-19चं सॅम्पल घेऊन तो तपासणीचं काम करू लागला. त्यातून चांगली कमाई होऊ ...

कथा संघर्षाची : संघर्ष लॉर्ड रिंकू सिंगचा!

इमेज
सिलिंडर डिलिव्हरी करणाऱ्या बापाच्या मुलाने जगभरातल्या क्रिकेटरसिकांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं. क्रिकेट खेळण्यासाठी सतत मार खावा लागलेल्या रिंकूने स्वतःला कसं घडवलं त्याची ही गोष्ट... टीम सलाम 2023च्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सला जिंकण्यासाठी गुजरात टायटन्स संघाविरुद्ध 5 चेंडूंत 28 धावांची आवश्यकता होती. स्ट्राइकवर होता रिंकू सिंग. फारसा प्रसिद्ध नसणाऱ्या रिंकूने पाच चेंडूंवर पाच षट्‌कार लावून संपूर्ण क्रिकेटविश्वाला धक्का दिला. तेव्हापासून रिंकू भारतातल्या कोट्यवधी लोकांना माहीत झाला. त्याचं नाव अलिगढ इथल्या एका स्टेडियमला देण्यात आलं. पुढे त्याची भारतीय क्रिकेट संघात निवड करण्यात आली. त्याची कामगिरी सगळ्यांनी बघितलीच; पण ज्या परिस्थितीत त्याने हे यश मिळवलं ते पाहणंही महत्त्वाचं आहे. रिंकूचा जन्म उत्तर प्रदेशातल्या अलिगढ जिल्ह्यातला. त्याचे वडील खानचंद्र सिंग हे एलपीजी सिलिंडर डिलिव्हरीचं काम करायचे, आजही करतात. रिंकूची आई वीणादेवी सिंग गृहिणी. गॅसच्या गोडाऊनशेजारी असलेल्या दोन खोल्यांमध्ये त्यांचा संसार होता. खानचंद्र आणि वीणादेवी यांना एकूण 5 मुलं. रिंकू त्यात तिसरा. रिंकूला श...