वस्तीतले धडपडे : पुण्यातल्या तृतीयपंथीयांच्या सन्मानासाठी झटणाऱ्या चांदणी गोरे

आपल्यासारख्या तृतीयपंथीयांनासन्मान मिळावाम्हणून झटणाऱ्याचांदणीगोरे यांचं काम फक्ततृतीयपंथीय समाजापुरतंच मर्यादित नाही.त्यांचा मदतीचाहातइतरांसाठीहीकायम पुढे असतो..

योगेश जगताप

‘ते' लोक पैसे मागतात, टाळ्या वाजवतात, चित्रविचित्र हावभाव करतात, भडक मेकअप करतात.. तृतीयपंथीय म्हटल्यावर याचगोष्टी आपल्या मनामध्ये येतात. आपण पैसे देता आणि त्यांना कसं तरी कटवतो. ते गेल्यावर नाक मुरडतो. सन्मानाने जीवन जगण्याची इच्छा असूनही बहुतांश तृतीयपंथीयांना पैसे मागूनच संसार चालवावा लागतो. त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी अप्पर इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या चांदणी गोरे धडपडते आहेत. चांदणीताई फक्त तृतीयपंथीयांसाठीच झटत नसून महिलांचे बचतगट, लहान मुलांसाठी शिकवणी चालवताहेत. 

34 वर्षांच्या चांदणीताईंचा जन्म पुण्याच्या शिवाजीनगर भागातला. शाळेत असतानाच त्यांना स्वतःच्या शरीरात होणारे बदल जाणवले. शरीर मुलाचं, पण मन मुलीचं. बारावीपूर्ण होईपर्यंत चांदणीताई मुलासारखं वागत राहिल्या. पण त्यानंतर त्यांच्यात झालेले बदल त्यांना लपवता आले नाहीत. की गोष्ट आई वडिलांना समजली, तेव्हा त्यांना हे स्वीकारणं जड गेलं. त्यामुळे ताईंना सतराव्या वर्षी घर सोडावं लागलं आणि त्या पुण्याच्या अप्पर इंदिरानगरमध्ये राहायला गेल्या. 

घर सोडल्यानंतर करायचं काय हा प्रश्न चांदणीताईंपुढे होता. रस्त्यावर पैसे मागणं, शुभकार्यावेळी नाचगाणं करणं, देहविक्री करणं ही कामं तृतीयपंथीयांना नाईलाजाने करावी लागतात. तशी चांदणीताईंनासुद्धा करावी लागली. पण आपण आपलं आयुष्य वाया घालवतोय, असं त्यांना सतत वाटत रहायचं. त्यामुळे एके दिवशी अशा कामांच्या वाट्याला जायचं नाही आणि शक्य तितक्या तृतीयपंथीयांना या चक्रातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायचा, असा निश्चय चांदणीताईंनी केला. पूर्वीचं काम सोडून सन्मान मिळेल असं काम शोधणं ताईंसाठी आव्हान होतं. खूप शोधल्यानंतरताईंना एचआयव्हीग्रस्तांसाठी काम करणाऱ्या एकासंस्थेत काम मिळालं.

रोजगाराचा प्रश्न मिटल्यानंतर चांदणीताईंनी तृतीयपंथीयांसाठी एक कट्टा सुरू केला. रोज भेटायचं आणि आपल्या आयुष्यातली सुख दुःख, खदखद व्यक्त करायची; अडचणींवर मार्ग काढायचा हा या कट्ट्याचा उह्ेश होता. सुरुवातीला कट्ट्यावर येणाऱ्यांची संख्या पाच ते दहा होती. हळहळूही संख्या वाढत जाऊन पन्नास झाली. गेली दहा वर्षं हा कट्टा तृतीयपंथीयांचा आधार देण्याचं काम करतो आहे. 

तृतीयपंथीयांना काम मिळणं लांबच राहिलं, पण बऱ्याचदा नागरिक म्हणूनही त्यांचे अधिकारही नाकारले जातात. हॉटेलमध्ये असो वा एखाद्या दुकानात खरेदीसाठी, अनेकदा त्यांना प्रवेशच नाकारला जातो. हे प्रकार कमी होण्यासाठी चांदणीताई पोलिस अधिकाऱ्यांना, राजकीय नेत्यांनावारंवार भेटतात. आतापर्यंत चांदणीताईंनी पोलिसांना हाताशी धरून अनेक दुकानदारांना माफी मागायला लावली. तसंच ताईंनी आतापर्यंत 15 हून अधिक तृतीयपंथीयांना नोकरी मिळवून दिली आहे. याशिवाय आधारकार्ड, रेशनकार्डसारखी कागदपत्रं मिळवून देण्याचं काम सुरूच असतं.

तृतीयपंथीयांना समाजात स्थान मिळवायचं असेल तर आपण त्या समाजाचा भाग झालं पाहिजे या विचाराने चांदणीताईंनी वस्तीतल्या महिलांशी ओळखी वाढवायला सुरुवात केली. वस्तीतल्या महिलांचे बचत गट तयार केले. याशिवाय ताईंनी मुलांसाठी शिकवणी वर्ग सुरू केले. सहकाऱ्यांच्या साथीने वस्तीतल्या लोकांसाठी आरोग्यशिबिरं भरवू लागल्या. या गोष्टींमुळे तृतीयपंथीय असूनही चांदणीताईंना वस्तीने स्वीकारलं. 

चांदणीताई बाललैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे हादरून जायच्या. या घटना रोखण्यासाठी काहीतरी करायलाहवं असं त्यांना वाटायचं. मग त्यांनी शिकवणीच्या मुलांनाच‘चांगलास्पर्श आणि वाईटस्पर्श' ओळखण्याचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. हे काम करताना कधी कधी ताईंनातृतीयपंथीय असल्याचा अडथळा येतो. पण आपल्या संभाषण कौशल्याने ताई सगळ्यांची मनं जिंकून घेतात.

हे सगळं करत असताना चांदणीताई एकास्थिर नोकरीच्या शोधात आहेत. रेडिओमध्ये निवेदिका होण्याचं त्यांचं स्वप्न आहे. त्यांचं स्वप्नपूर्ण होईल का? की त्यांना या स्वप्नाचा त्याग करावं लागेल? के काळच ठरवेल. पण चांदणीताई जे काम करतायत ते मोलाचं आहे. त्यांच्या कामामुळे चांदणीताईंपेक्षा मोठ्या असणाऱ्या तृतीयपंथी महिलाताईंना आई आणि मम्मी म्हणून हाक मारतात. समाजाकडून सहानुभूतीच्या प्रतीक्षेत असलेल्या पुण्यातल्या तृतीयपंथीय महिलांना चांदणीताईंमुळे दिलासा वाटतो. अशा चांदणीताईंचं स्वप्नपूर्ण करायला आपणही मदत करायला हवी. 

पैसे मागणं हेच बऱ्याच तृतीयपंथीयांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. लॉकडाऊनमध्ये पैसे मागणंच बंद पडल्यामुळे आम्हा तृतीयपंथीयांचे हाल झाले. तेव्हा चांदणीताईंनी दानशूर व्यक्तींकडे जाऊन आमच्या समाजासाठी रेशन किटची आणि आर्थिक मदत मिळवून दिली.

आमच्या प्रत्येक संकटात चांदणीमम्मी आमच्यासोबत असते. तृतीयपंथी महिला नाईलाजाने ज्या मार्गाचा अवलंब करतात, त्या मार्गापासून आम्हाला त्यांनी दूर नेलं. मला त्यांनी एका कॉफीशॉपमध्ये मॅनेजरची नोकरी मिळवून दिली. त्यामुळे मी आयुष्यात काही तरी करू शकते हा आत्मविश्वास मिळाला.  

- किरण खंडाळे, सहकारी

अंक - जून 2022 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

कथा संघर्षाची : रॉकस्टार मंगलताई