कथा संघर्षाची : मी स्वत:शीच पैज खेळते...

भारतात दर पाचव्या मिनिटांला एक बाई नवऱ्याचा मार खाते. ही कुचंबणा झुगारता येते. लक्ष्मी वाल्हेकरांनी हे दाखवून दिलंय... प्रशांत खुंटे लक्ष्मी वाल्हेकर तुला वाटलं असंल मी खचंल. मी रडंल. तुझा वंश तर मिटला. ल्योक वारला. पण मी माझ्या लेकींना कमी पडू देणार नाही. लक्ष्मीताईंचा छोटासा मुलगा वारला. त्या दिवशी त्यांनी नवर्याला हे सुनावलं. आपण सोसलं ते मुलींच्या वाट्याला येवू नये. असं त्यांना वाटतं. ‘मी तीस वर्षांची होईल तोवर माझ्या पायावर उभी राहिलेली असेल!' घर सोडताना त्यांनी नवर्याला दिलेलं हे वचन खरं करून दाखवलंय. त्यांनी तिशी ओलांडली. आज त्या खंबीरपणे जगताहेत. लक्ष्मी वाल्हेकरांनी तमाम कष्ट सोसले. स्वत:च्या हिमतीवर मुलीचं लग्न केलं. दुसर्या मुलीच्या शिक्षणासाठी त्या झटताहेत. पैशांची चणचण असतेच. पण हरहून्नरी लक्ष्मीताई नवनव्या रोजगार संधी शोधतात. त्या आठवीपर्यंतच शिकल्यात. आय.टी. कंपनीत त्या झाडलोट करत. तिथे लोक आपसात इंग्रजी बोलत. कानांवर पडलेले ते शब्द यांनी टिपले. त्यांचे अर्थ लावले. त्यामुळे त्या कामापुरतं इंग्लिशही बोलू लागल्या. अल्पशिक्षित असलेल्या लक्ष्मीताई आज कोविड हॉस्पीटलध्ये...