एकीकडे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात वॉर्डबॉयचं काम करत दुसरीकडे गायनाचा छंद जोपासणारे ताडीवाला रोड वस्तीतले प्रल्हाद शिंदे. गण-गवळण, भीमगीत, बुद्धगीत, स्मृतिगीत, शोकगीत.. अशा अनेक हिंदी-मराठी गाण्यांवर आपल्या आवाजाचा ठसा उमटवणाऱ्या प्रल्हाद शिंदे यांच्याविषयी.. अर्जुन नलवडे ‘आग लावली पाण्याला..', ‘गाई कोकिळा गाणे..', ‘तुझा फोन आल्यावर मनाला वाटतं बरं..' अशी एकापेक्षा एक सरस गाणी ऐकणाऱ्यांना खिळवून ठेवतात. ही गायली आहेत प्रायव्हेट रोड वस्तीत राहणाऱ्या प्रल्हाद शिंदे यांनी. पहाडी आवाजाचा गायक म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांचा जन्म ताडीवाला रोड वस्तीमध्ये 14 फेब्रुवारी 1965ला झाला. त्यांचे आई-वडील रेल्वेत मालधक्क्यावर काम करायचे. घरची आर्थिक स्थिती बेताचीच होती. तरी ते बारावीपर्यंत शिकले. त्यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती. शाळेतील पुस्तकांपेक्षा गाण्यांच्या पुस्तकात ते जास्त रमायचे. रस्त्यावर गाणाऱ्या गायकांची गाणी ऐकण्यात मग्न होऊन जायचे. त्यांच्या गाण्याला घरातील लोकांचा विरोध झाला, पण त्यांनी गाणं काही सोडलं नाही. शिंदे सांगतात, “पूर्वी रस्त्यांवर गा...