वस्तीतले धडपडे : विद्यार्थ्यांच्या रूपात स्वत:चं स्वप्न पूर्ण करणारा हनुमंत रेगी

वडारवाडीतला एक तरूण स्केटिंगसारख्या महागड्या समजल्या जाणाऱ्या खेळात नॅशनल चॅम्पियनशिप खेळतो. तेवढ्यावरच न थांबता पुढील पिढी तयार करण्यासाठी धडपडत राहतो. संकटावर मात करत यश मिळवणाऱ्या 'स्केटिंग कोच'ची कहाणी मयूर पटारे स्केटींग हा खेळ तसा अनेकांसाठी अपरिचित. पण पुण्यातील एक तरुण हा खेळ शिकतो. त्यात विशेष कामगिरी करतो. स्केटींगमध्ये नॅशनल चॅम्पियनशिप खेळतो आणि एवढ्यावरच न थांबता पुढील पिढी तयार करण्यासाठीही धडपडत राहतो. संकटावर मात करत ध्येयशील राहणाऱ्या ‘स्केटींग कोच' ची कहाणी. हनुमंत रेगी हा पुण्यातील वडारवाडीमध्ये राहणारा हरहुन्नरी तरुण. वडारवाडीत पांडुरंग पोलिस चौकीजवळ हनुमंतचा जन्म झाला. आई, वडील, तीन भाऊ आणि पाच बहिणी असा हनुमंतचा परिवार. वडील मजुरी करतात. आई गृहिणी. दोघंही निरक्षर. घरची परिस्थिती हलाखीची. तीन वेळा स्कॉलरशिप मिळवून त्याने दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. पुढे त्याने फ्रँकफीन कॉलेजमधून एव्हिएशनचा कोर्स केला. मॉडर्न कॉलेजमधून बी. ए. पूर्ण केलं. शिक्षण चालू असताना वर्तमानपत्र टाकणं, दूध टाकणं, पुढे सिमकार्डची बंटिंग करणं, तसेच कोविडच्या काळात मित्रांच्या ...